Ad will apear here
Next
शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती मिळणार अॅपवर
कृषी पणन मंडळाने विकसित केले मोबाइल अॅप
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आता रोजचा बाजारभाव, बाजार समित्यांमधील मालाची आवक, विविध योजना यांची माहिती आता मोबाइलवर अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे. कृषी पणन मंडळाने ‘एमएसएएमबी’ नावाने मोबाइल अॅप विकसित केले असून, ते गुगल प्ले स्टोअरवर मराठी आणि इंग्रजी भाषेत मोफत उपलब्ध आहे. 

‘सध्या अनेक व्यवहार मोबाइलवर करण्यात येतात. कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते. कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना, उपक्रम, बाजारभाव, बाजार समित्यांची एकत्रित माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी हे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील व इतर राज्यांमधील  बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची रोजची आवक, बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, शेतकरी आठवडी बाजार, कृषी पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण इत्यादीबाबतची सर्व माहिती शेतकऱ्यांना या अॅपद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे,’ अशी माहिती पणन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी (२७ ऑगस्ट) मुंबईत दिली.   

‘सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती या अॅपद्वारे भरता येते. त्यामुळे बाजार समित्यांमधील बाजारभावांची माहिती एकत्रितरीत्या उपलब्ध होते. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे,’ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 

(हे अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPQCD
Similar Posts
शेतकऱ्यांना खूशखबर; विनातारण कृषिकर्जाच्या मर्यादेत वाढ मुंबई : अर्थसंकल्पापाठोपाठ रिझर्व्ह बँकेनेही शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. बँकेने द्वैमासिक पतधोरणात शेतकऱ्यांसाठी विनातारण कृषिकर्जाच्या रकमेत सुमारे ६० हजार रुपयांची वाढ केेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाखाऐवजी एक लाख ६० हजार रुपये कर्ज विनातारण मिळणार आहे.
आई! ‘शेतकऱ्याचा प्रश्न हा असाच प्रश्न आहे. ते आपलं बाळ आहे असं समजून, आईच्या मायेनं त्याला संकटातून जपत बाहेर काढलं पाहिजे. त्यात राजकारण झालं, तर अगोदरच समस्यांचे तडाखे सोसणारा शेतकरी अधिक घायाळ होईल...’
अवकाळी पाऊस पीक नुकसानभरपाईसाठी दहा हजार कोटींची तरतूद : मुख्यमंत्री मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाच्या भरपाईसाठी अंतिम आकडेवारी निश्चित होईपर्यंत दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. नुकसानाच्या पंचनाम्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असून, यंत्रणा पोहोचली नसेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोबाइलवर
अमरावती, नाशिक विभागासाठी वाढीव दुष्काळनिधी मंजूर मुंबई : अमरावती आणि नाशिक या विभागातील शेतकऱ्यांना वर्ष २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळासाठी देण्यात येणाऱ्या मदतनिधीत वाढ करण्यात आली आहे. ‘विभागनिहाय निधी वाढवून देण्याची विनंती या विभागांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन ३१८३५.९० लाख रुपयांच्या अतिरिक्त मदतनिधीला मान्यता देण्यात आली आहे,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language